जम्मू-काश्मीरची वीज वहन क्षमता ३३टक्क्यांनी वाढली

    दरवर्षी बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यामध्ये होणारे भारनियमन यंदा जम्मू काश्मीरमध्ये होणार नाही. काश्मीरमध्ये दरवर्षी जवळपास 2 कोटी लोकांना हिवाळ्यात वीज मिळत नव्हती. त्यामुळे पर्यायी आपत्कालीन ऊर्जा म्हणून लोकांना जंगलातील लाकडे आणावी लागत असत. नुकतेच (१५ ऑक्टोबर २०१८) स्टरलाईट पॉवर कंपनीने त्यांची ४००KVची ४१४किमी लांबीची बारामुल्ला ते जालंधर (चित्रातील निळी लाईन)…