सध्या एका कामवाल्या काकूंचा १८०० रुपये हिशोबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फिरतोय. बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ मजेशीर वाटला. काहीजणांनी तर कामवाल्या काकूंच्या समर्थनार्थ सरकारने १८०० रुपयांची नोट बाजारात आणावी म्हणून प्रतिक्रियात्मक व्हिडिओ सुद्धा बनवले. खरतर माझ्याकडून तो व्हिडिओ संपूर्ण बघवला नाही. त्या काकू ज्या तळमळतेने त्यांची बाजू मांडत होत्या…