sterlite power kashmir transmission line

    दरवर्षी बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यामध्ये होणारे भारनियमन यंदा जम्मू काश्मीरमध्ये होणार नाही. काश्मीरमध्ये दरवर्षी जवळपास 2 कोटी लोकांना हिवाळ्यात वीज मिळत नव्हती. त्यामुळे पर्यायी आपत्कालीन ऊर्जा म्हणून लोकांना जंगलातील लाकडे आणावी लागत असत. नुकतेच (१५ ऑक्टोबर २०१८) स्टरलाईट पॉवर कंपनीने त्यांची ४००KVची ४१४किमी लांबीची बारामुल्ला ते जालंधर (चित्रातील निळी लाईन) पारेषण वाहिनी (transmission line) चार्ज केल्याचं घोषित केलं. जानेवारी २०१५मध्ये प्रकल्पाचे काम सुरु झाले होते. १३५ किमी लांबीचा पहिला टप्पा जून २०१६ मध्ये पूर्ण झाला. ऑगस्ट २०१५ मध्ये सुरू झालेला २७९ किमीचा दुसरा टप्पा ऑक्टोबर २०१८ला पूर्ण केला.

transmission line in mountain

    या प्रकल्पामुळे काश्मीर खोऱ्यात १०००MW अतिरिक्त वीज पोहोचली आहे. राज्याची पारेषण क्षमता ३३ टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे ठरलेल्या तारखेच्या २महिने आधी कंपनीने हा प्रकल्प पूर्ण केला आहे (good governance🤔) येत्या काळात २२०KVची श्रीनगर ते लेह दरम्यानची वहिनी पॉवरग्रीड चार्ज करणार आहे. या प्रकल्पाचे सर्व काम मोदी सरकारच्या काळात झालं आहे. 

sterlite kashmir helicrane

    हा प्रकल्प तडीस नेण्यासाठी कंपनीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. डोंगराळ भागात साहित्य नेण्यापासून ते उंचावर मनोरे (tower) बांधण्यापर्यंत; प्रत्येक ठिकाणी अडथळे होते. हि वाहिनी पाकिस्तानच्या सीमेजवळून जात असल्याने सुरक्षेचा प्रश्नसुद्धा महत्वाचा होता. स्टरलाईट पॉवर कंपनीने अतिशय मेहनतीने हे काम पूर्णत्वास नेलं आहे. साहित्य वाहून नेण्यासाठी कंपनीने Helicrane वापरली होती. National geographicने याच्यावर Extreme Tech अंतर्गत एक भाग पण दाखवलाय. हे काम किती कठीण होतं हे अनुभवायचं असेल तर एकदा खालील व्हिडिओ नक्की बघा.