Diploma आणि Degreeला असताना मी ज्या कारणासाठी Google वापरत नव्हतो त्या बद्दल आज मी लिहिणार आहे. सगळे मित्र Android मोबाईल वापरत असताना मी Windows फोन वापरायचो. अँड्रॉइड फोनवर आपल्या डेटाच्या गूपनीयतेबाबत माझ्या मनात अफाट शंका होत्या. पण शेवटी एकेदिवशी मलासुद्धा Androidला shift व्हावं लागलं. याचे मुख्य कारण म्हणजे विंडोज फोन वर app support कमी होत होता त्यामुळे दिवसेंदिवस मला फोन वापरणे अवघड जात होते.
अलीकडच्या वर्षात प्रसार माध्यमातून आलेल्या डेटा लीक आणि अमेरिकेतील निवडणुकीतील मोठ्या टेक कंपन्यांच्या हस्तक्षेपाच्या बातम्यांनी माझी अँड्रॉइड बद्दलची शंका अधिक ठळक होत होती. आपल्या रोजच्या जीवनात गूगल किती ढवळाढवळ करतंय याचा पुरावा देणारा एक व्हिडीओ नुकताच माझ्या बघण्यात आला.
फसवे search results आणि जाहिराती दाखवून अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप Google आणि Facebook वर आहे!!
आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून गूगल कडे होत असते (GPS location, type केलेले शब्द, गूगल वर search केलेले शब्द, इत्यादी ) त्याचा वापर करून ( इथे artificial intelligence आणि machine learning वापरतात ) गूगल सगळ्यांना आवडणारे result दाखवत.
उदा. जागतिक तापमानवाढ हे थोतांड आहे का? (Is climate change hoax?) असं गूगलवर type केलं तर जागतिक तापमानवाढ कसं खरं आहे याचेच search results येतात. ते थोतांड (hoax) कसं असू शकतं याचे results येतच नाहीत. आपल्या रोजच्या मोबाईल वापराच्या सवयीवरून गुगल आपला स्वभाव ओळखत आणि सगळ्यांना चांगले वाटतील असे results दाखवतं. तुम्हा-आम्हाला कुठल्याही विषयावर त्रयस्थ बाजूने विचार करायची संधीच मिळत नाही. थोडक्यात, गूगल ठरवत आपण काय वाचायचं ते!!
आता गूगल कडे फक्त लोकांच्या DNAची माहिती नाहीए. ते सोडून त्याला सगळं माहीत आहे. कोण कुठं किती वेळ कशासाठी (shopping, etc) जातं. कसं जातं ( गाडीतून गेला तर gps फास्ट जागा बदलतं. चालत गेलात तर slow बदलतं. यावरून गूगल ला कळतं तुम्ही चालत कुठे जाता आणि गाडीने कुठे जाता.)
एकदा का गूगलला सगळ्यांचे DNA मिळाले तर त्याला संपूर्ण जगाचा अनभिषिक्त सम्राट व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यापुढे जगातल्या कुठल्याही देशाच्या सरकारचा निभाव लागणं अवघड आहे.
DNA गोळा करायला Google भविष्यात Amazon आणि Flipkartशी हातमिळवणी करायलाही पुढे मागे बघणार नाही. कारण Amazon, Flipkart लोकांच्या थेट संपर्कातल्या कंपन्या आहेत. (हा माझा वयक्तिक तर्क आहे)
DuckDuckGo (डक डक गो) गूगलला चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे. आपण search केलेल्या गोष्टींवर DuckDuckGo कुठलाही बदल करत नाही. त्या search termशी संबंधित results दाखवले जातात. गुगल आणि DuckDuckGo बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा 13 मिनिटांचा व्हिडिओ नक्की बघा आणि मोबाईल आणि लॅपटॉप वर Google.com ऐवजी DuckDuckGo.com default search engine ठेवायला विसरू नका.