हिमालयातील लेह-लडाख परिसरात येत्या काळात भारतीय रेल्वेचा वावर असण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर ते जम्मू काश्मीरमधील मनाली आणि लेह या ४६३किमी. लाईनसाठी ₹८३,३६० कोटी खर्चाचा अहवाल नुकताच भारतीय रेल्वेच्या समितीने केंद्र सरकारकडे जमा केला आहे. जर रेल्वेची सुविधा लेहपर्यंत पोहोचली तर केवळ हिमाचलसाठीच रहदारी सुविधा बदलणार नाही तर पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल.

indian railways kashmir leh manali

    हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक महत्त्वाची शहरे यानिमित्ताने देशातील इतर भागाशी जोडली जातील. ह्या मार्गाद्वारे भारतीय रेल्वे समुद्रसपाटीपासून ५.३किमी उंचीवर जाणार आहे. सध्या चीन याच भागाजवळ त्यांच्या क्षेत्रात समुद्रसपाटीपासून 2 किमी (कुंघाई-तिबेट रेल्वे लाईन) एवढ्या उंचीवर रेल्वेने वाहतूक करतोय. बिलासपूर-मनाली-लेह रेल्वेमार्गाची काही वैशिष्ठये खालीलप्रमाणे;

  • या प्रकल्पात ७४ बोगदे, १२४ मोठे पूल आणि ३९६ लहान पूल बांधले जातील.
  • हा प्रकल्प झाल्यावर मनाली ते लेह हे अंतर सध्याच्या ४० तासांवरून २० तासांवर येईल.
  • ही रेल्वे भारतीय सैन्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आपत्कालीन परिस्थितीत सीमेवर युद्धाचे सामान नेण्यासाठी लष्कर या रेल्वे मार्गाचा वापर करू शकेल. लेहमधील लष्करी बेस कर्मचा-यांना सामान मिळवणे सोपे होईल.
  • भारतीय रेल्वेचा हा आत्तापर्यंतचा सर्वात अवघड प्रकल्प असणार आहे.

    लेहचे भाजप खासदार त्सुप्तन छेवंग या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाकडे हात धुवून मागे लागलेयत अशी चर्चा आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक लोकांच्या मनात ह्या प्रकल्पाबद्दल शंका उपस्थित होत होत्या. ह्या प्रकल्पाला राष्र्टीय प्रकल्प घोषित करून सरकारने हे काम घेतल्याचे दिसतंय.