राणी मुखर्जी शिवाय मला कल्की कोचलीन आणि कंगना राणावत आवडते. यापैकी कंगना राणावतबद्दल सांगायचं म्हणजे मूळची मॉडेल असलेल्या कंगनाने अभिनयाच्या क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडलीय. तिचं ‘तनु वेड्स मनू‘ आणि ‘तनु वेड्स मनू 2‘ मधलं काम लाजवाब होतंच शिवाय ‘फॅशन ‘ मधली छोटीशी भूमिकासुद्धा जबरदस्त होती.
गेली २ -३ वर्ष मी कंगनाला social media वर follow करतोय. त्यावरून मला तिच्याबद्दल दोन ओळी लिहाव्या वाटल्या. होय मोजून दोनच ओळी आहेत.
ओळ नं १:
कंगना अशी एकमेव मॉडेल आहे जी जगातला कुठलाही पेहराव (ड्रेस/साडी/वन पीस,etc), कुठलीही केशरचना (hairstyle) आणि कुठलीही लिपस्टिक सहज बाळगू शकते (carry करू शकते).
मी एवढी dynamic मॉडेल अजून पर्यंत बघितली नाही. बऱ्याचदा एखाद्या actressची फॅशन choice चुकली कि माध्यमांमधून खिल्ली उडवली जाते. (Pinkvilla.com वर अशा बातम्यांचा खच पडलेला असतो.) कंगना मात्र त्याला अपवाद राहिली आहे. तसं म्हणायला तिच्या फॅशनवर सुद्धा अनेकदा उपहासात्मक लिहिलं आहे पण मला त्यातला एकही लेख मान्य नाही.
कंगना कडून शिकण्याची गोष्ट म्हणजे तिची कॉन्फिडन्स लेवल! प्रत्येक नवीन पेहराव, प्रत्येक नवीन केशरचना आणि प्रत्येक नवीन रंगाची लिपस्टिक ती तितक्याच नवीन ऍटिट्यूडने मिरवते
ओळ नं २:
Confidence आणि attitude कसा carry करायचा ते कंगना कडून शिकावं
या होत्या कंगना बद्दलच्या २ ओळी 😀
माझ्या म्हणण्याला आधार म्हणून खाली कंगनाचे १५ फोटो देत आहेच शिवाय खात्री करण्यासाठी तुम्ही कंगनाचे फोटो गुगल करून बघा.