९ सिलिंडर की १२ सिलिंडर?

  एके काळी भारतात सरकारने वर्षाला किती अनुदानित सिलिंडर द्यावेत यावर वर्तमानपत्रात ठळक बातम्या येत होत्या. अग्रलेख लिहिले जात होते. कदाचित त्यावेळी त्या बातमीदार किंवा लेखकांना काळाच्या पोटात काय दडलंय याची तुसभरही कल्पना नव्हती. आज ४ वर्षांनी जेव्हा मला त्या बातम्या आठवतात तेव्हा ‘देश बदलतोय‘ या म्हणण्यावर विश्वास बसतो. काल…

गुजराती प्लास्टिकवरील बंदी

सरता आठवडा गाजला तो प्लास्टिक बंदीच्या बातम्यांनी. आठवड्याचा शेवटी सगळ्या चॅनलनी अक्षरशः प्लास्टिकला डोक्यावर घेतलं होतं. २०१८मधला सरकारचा वाखाणण्याजोगा निर्णय म्हणून या निर्णयाकडे बघता येईल. सुरुवातीला मार्चमध्ये लागू केलेल्या प्लास्टिक बंदीला नियमाप्रमाणे कोर्टाच्या कचाट्यातून जावं लागलं. सरकारच्या हर एक निर्णयाला कोर्टात नेऊन अडकवून ठेवायचा एक चुकीचा पायंडा आपल्या समाजात पडलाय….

अमित शहा : राजकारणातला थॅनोस

ज्याप्रकारे भारतीय जनता पार्टी एकामागे एक निवडणुका जिंकत चाललीय त्यावरून मला अमित शहांमध्ये थॅनोसची झलक दिसायला सुरुवात झालीय. बिथरलेल्या विरोधकांना अमित शहा दरवेळी नवीन राजकीय खेळी करून खिंडीत पकडतात. या निमित्ताने बऱ्याच महिन्यानंतर Photoshop वापरायची संधी मिळाली आणि अमित शहा ६ इन्फिनिटी स्टोन्स सोबत कसे दिसतील ते बघितलं. जमलंय का…