सरता आठवडा गाजला तो प्लास्टिक बंदीच्या बातम्यांनी. आठवड्याचा शेवटी सगळ्या चॅनलनी अक्षरशः प्लास्टिकला डोक्यावर घेतलं होतं. २०१८मधला सरकारचा वाखाणण्याजोगा निर्णय म्हणून या निर्णयाकडे बघता येईल. सुरुवातीला मार्चमध्ये लागू केलेल्या प्लास्टिक बंदीला नियमाप्रमाणे कोर्टाच्या कचाट्यातून जावं लागलं. सरकारच्या हर एक निर्णयाला कोर्टात नेऊन अडकवून ठेवायचा एक चुकीचा पायंडा आपल्या समाजात पडलाय….